निष्ठुर पतीने कडाप्पा डोक्यात घालून केला पत्नीचा खून

पिंपरी – किरकोळ कारणावरुन पतीने डोक्यात कडाप्पा घालून पत्नीचा खून केल्याचा प्रकार वाकडच्या काळाखडक परिसरात सोमवारी (दि. 1) मध्यरात्री घडला.

वाकड पोलिसांनी आरोपी पती रमेश हनुमंत पुजारी (वय 35 रा. काळाखडक, वाकड) याला अटक केली आहे. तर ललीता रमेश पुजारी (वय 30 रा.काळाखडक) असे मयत पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा ललीता यांच्यावर सतत चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत होती. सोमवारी देखील अशीच भांडणे झाली ज्यामध्ये आरोपीने ललीता यांना मारहाण केली. कड्डाप्पा फर्शी डोक्यात घालून त्यांचा खून केला. त्याला अटक करण्यात आली असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share to