पिंपळे गुरवमध्ये कोयत्याचा धाक दाखवून रिक्षाचालकाला लुटले

पिंपरी – पिंपळे निलखचा रस्ता विचारण्याचा बहाना करत रिक्षाचालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना सोमवारी (दि. 1) पहाटे चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

हणुमंत लक्ष्मण थोरात (वय 45 रा. फुगेवाडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तीन अज्ञाता व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीहे त्यांची रिक्षा एमएच 14 एचएम 6128 घेऊन पिंपळे गुरव येथील पेरुच्या बागेजवळून जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेले तीन अज्ञात इसम यांनी फिर्यादींची रिक्षा थांबवली. त्यांनी त्यांचे चेहरे रुमालाने बांधले होते. यावेळी त्यांनी फिर्यादी यांना पिंपळे निलखला रस्ता कोठून जातो म्हणून पत्ता विचारला.फिर्यादी जवळ येवून पत्ता सांगत असताना चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी जवळील मोबाईल घेऊन पळून गेले.यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

Share to