अण्णा भाऊ साठे यांच्या महान कार्याचा वारसा सर्वांनी जोपासावा – सचिन अहिर
पिंपरी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य व्यापक असून त्यांनी केलेल्या महान कार्याचा वारसा सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी केले.
निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वास माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी भेट दिली तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी माजी नगरसदस्य अॅड. सचिन भोसले, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, भाऊसाहेब अडागळे, संदिपान झोंबाडे, संदिप जाधव, युवराज दाखले सतिश भवाळ, अरूण जोगदंड, स्वत्निल जाधव, मयुर जाधव, भानदास साळवे, मोहन वाघमारे, विजय कांबळे, सुनिल भिसे, नाना कसबे, आकाश अडागळे, गणेश साठे, नितीन घोलप, दशरथ सकट, धम्मराज साळवे आदी उपस्थित होते.