मंत्रीमंडळात संधी न मिळाल्याने पंकजा मुंडेनी व्यक्त केली खदखद, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेंनी दिला महत्वाचा सल्ला

मुंबई – पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना सूचक प्रतिक्रिया दिली. “मी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रीमंडळ बनवायचं असतं, त्यात सगळ्यांना समाधानी करता येत नसतं. पण जे मंत्री झाले आहेत, त्यांनी तरी लोकांना समाधानी करावं” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रीपदासाठी वरिष्ठांची भेट घ्या, असा सल्ला दिला आहे

एकनाथ शिंदे म्हणाले,’पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळेल किंवा नाही याबाबत मला शंका वाटत आहे. मात्र त्यांनी मंत्रिपद मिळण्यासाठी जास्त वाट न पाहता आपल्या वरिष्ठांना भेटावे. असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले,’मंत्रीमंडळ विस्तार अपूर्ण दिसत असून येत्या काळात तो पूर्ण होईल अशी आशा आहे. मात्र गेल्या काही काळात गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर सातत्याने अन्याय केल्याचं दिसत आहे. यामध्ये पंकजा मुंडेही आहेत. आताही पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे.’ असं म्हणत खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Share to