दापोडी-बोपोडीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

पिंपरी – दापोडी बोपोडी येथे बाल विकास प्रकल्पांतर्गत भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

बाल विकास प्रकल्प अधिकारी दापोडी-बोपोडी कार्यालयाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ममता शिंदे मॅडम, सुपरवायझर प्रितम नरळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ अमॢत महोत्सव हर घर हर तिरंगा या कार्यक्रमाअंतर्गत रहाटणी बीट मधील सेविका व मदतनिस यांनी अंगणवाडी मधील मुलांच्या वेशभुषा स्पर्धा घेण्यात आल्या.

दिंनाक ८/८/२०२२ पासुन अंगणवाडी स्तरावर निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा यांच्या विजेत्या स्पर्धकांचे बक्षिस वितरण करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाला मिना मोहीते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

Share to