शहरात स्वाईन फ्ल्युने एकाचा मृत्यू, रुग्णांमध्ये झाली वाढ
पिंपरी – सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्वाईन फ्ल्यु (H1N1) आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अद्यापपर्यंत २५ रुग्ण स्वाईन फ्ल्यु (H1N1) आजाराने बाधीत झाले आहेत. तसेच दि. २३ ऑगस्ट २०२२ रोजी एका रुग्णाचा मृत्यु झाला आहे.
या आजाराची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
१) ताप
२) घसादुखी, घशाला खवखव
३) खोकला, नाक गळणे
४) अंगदुखी
५) डोकेदुखी
६) बालरुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपाचा ताप आढळतो तसेच घसादुखी असणा-या बाळांमध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते. या अनुषंगाने सध्या आढळून येत असलेल्या “इन्फ्ल्युएंझा ए एच१ एन१” केसेस पाहता सर्वसामान्य जनतेने “इन्फ्ल्युएंझा ए एच १ एन १” होऊ नये म्हणून वैयक्तिक पातळीवर खालील प्रमाणे काळजी घेणेबाबत वैद्यकिय
विभागामार्फत नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
- वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.
- पौष्टिक आहार घ्या.
- लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा.
- धुम्रपान टाळा.
- पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
- भरपूर पाणी प्या.
- हस्तांदोलन टाळा.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
- डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका.
- आपल्याला फ्ल्यु सर्दुश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
- खालील नमुद व्यक्तींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णांलयामध्ये स्वाईन फ्ल्यु (H1N1) प्रतिबंधात्मक लसीकऱण करण्यात येत आहे.
१) गंभीर स्वाईन फ्ल्यु रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि अवैद्यकिय कर्मचारी,
२) गरोदर महिला,
३) उच्च रक्तदाब व मधुमेह असलेले रुग्ण (अति जोखिमेचे रुग्ण)
स्वाईन फ्ल्यु तपासणी-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या य.च.स्मृती रुग्णालय, नविन थेरगांव रुग्णालय, ह.भ.प.मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय(नविन आकुर्डी रुग्णालय), नविन भोसरी रुग्णालय व नविन जिजामाता रुग्णालय येथे अतिदक्षता विभागामध्ये दाखल असणा-या रुग्णांची स्वाईन फ्ल्यु तपासणी केली जाते.