उघड्यावर बायोमेडिकल वेस्ट टाकणा-या तीन आस्थापनांवर दंडात्मक कारवाई
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आरोग्य व पर्यावरणचे नियम भंग करून सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जैववैद्यकीय घनकचरा टाकणा-या तीन आस्थापनांवर दंडात्मक करावाई करण्यात आली.
आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांच्या आदेशानुसार ग्रीन मार्शल पथकांमार्फत सावर्जनिक ठिकाणी उघड्यावर जैववैद्यकीय घनकचरा टाकण्या-या आस्थापानावर दंडात्मक कारवाइ करण्यात आली.
१) धनश्री मेडिकल, पिंपळे सौदागर, दिनांक – २३/०८/२०२२
२) हेल्थ एक्यूरेट लॅब, पिंपळे सौदागर, दिनांक – २४/०८/२०२२
३) शाश्वत हॉस्पिटल, औंध, पुणे, दिनांक – २६/०८/२०२२
या आस्थापनांकडून बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकण्यात आला होता. त्यामुळे प्रत्येकी ३५००० रुपये प्रमाणे एकूण तीन आस्थापानांवर कारवाई करून १ लाख पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.
या कारवाईमध्ये सहा आरोग्य अधिकारी महेश आढाव, आरोग्य निरीक्षक उमेश जाधव व लिपिक आकाश मडके, मनपा कर्मचारी रवी हटकर, गणेश थरकुडे, MSF जवान दशरथ घुले, महेश कदम, वैशाली कदम व तृतीय पंथीय पथक यांचा समावेश होता.