आई-वडिलांबरोबर देशाची मान उंचावण्याचे ध्येय युवकांनी बाळगावे – अमित गोरखे
- नॉव्हेल्स एनआयबीआरच्या विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर निवड
पिंपरी –“` तुम्हांला आयुष्यात जी गोष्ट करायची आहे. ती मन लावून करा. आई-वडिलांबरोबर देशाची मान उंचावण्याचे ध्येय युवकांनी उराशी बाळगावे, असे प्रतिपादन नॉव्हेल ग्रूफ ऑफ इन्स्टिट्य़ूटचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गोरखे यांनी केले. नॉव्हेल्स एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, निगडी येथील पदवीधारक विद्यार्थी कु. राज रमेश गायकर यांची युएसए येथील हॉटेल हिल्टन येथे फ्रंट ऑफिस मॅनेजर या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. त्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.
युएसए येथील हॉटेल हिल्टन येथे फ्रंट ऑफिस मॅनेजर या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी विस्डम करिअर एज्युकेशन प्रायवेट लिमिटेड वाशी यांच्या माध्यमातून कु. राज गायकर याची निवड झाली आहे. तो चिंचवडगाव येथील रहिवाशी आहे. राजचे वडील टेल्को कंपनी, भोसरी येथे काम करतात. आई गृहिणी आहे. इंटर्नशिपसाठी निवड झाल्याबद्दल राज गायकर याचा सत्कार नॉव्हेल्स एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, निगडी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. अमित गोरखे म्हणाले, “चिंचवड येथील रहिवाशी असलेल्या या विद्यार्थ्यांच्या यश पिंपरीरी-चिंवडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी जे जे चांगलं ते निवडण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्या देशात शिकत असतांना तिथल्या चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात. आपल्या देशात परत आल्यानंतर समाजाचा विकास करण्यासाठी त्याचा उपयोग करा”.
प्राचार्य श्री. वैभव फंड म्हणाले की, “नॉव्हेल्स एनआयबीआर २००३ सालापासून शिक्षण क्षेत्रात आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांच्या सक्सेस स्टोरीज आहेत. तीन वर्षात तुम्ही जे काही शिक्षण घ्याल. त्यातून तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडवण्याचा विश्वास निर्माण झाला पाहीजे. म्हणजे तुम्हांला करिअरच्या संधी आपोआपच निर्माण होतील”.
कु. राज रमेश गायकर यांच्या प्रवासात त्याला कॉलेजचे ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट कॉर्डीनेटर प्रोफेसर शंतनू देशपांडे व इतर प्राध्यापक वर्गाने मार्गदर्शन केले.