पन्नास खोके… महागाई ओके… सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
नाशिक : वाढत्या महागाई विरोधात युवक काँग्रेसच्यावतीने गुरूवारी (दि.१) राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी “५० खोके महागाई एकदम ओके, अशा घोषणा देत राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग व शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी हे आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले असून, रुग्णालय सेवा, शिक्षण यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावत आहे. त्यामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. केंद्र व राज्य सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यावर विविध केंद्रीय संस्थांमार्फत अडकविले जात आहे. त्यामुळे देशात हुकुमशाही होत असल्याचा आरोप करत युवक राष्ट्रवादीने महागाई विरोधात आंदोलन केले.
यावेळी ५० खोके, महागाई ओके अशा घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनात महेश भामरे, शादाब सय्यद,जय कोतवाल, गोटू आहेर, सागर बेदरकर, दत्ता वाघचौरे, विशाल डोखे, दिनेश धात्रक, राहुल कमानकर, गौरव ढोकणे, संतोष जगताप, कपिल भावले,डॉ.संदीप चव्हाण, अभिषेक शेवाळे, जाणू नवले, अक्षय भोसले, विक्रांत डहाळे, विक्रम जगताप, हर्षल चव्हाण, सुनिल घुगे, किरण भुसारे आदी सहभागी झाले होते.