बाप्पांची कृपा : गेल्या 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत 7.7 टक्क्याची घट
मुंबई – गेल्या २४ तासांमध्ये देशात ३४ हजार ९७३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. तर, ३७ हजार ६८१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारच्या (९ सप्टेंबर) तुलनेत नव्या करोना रुग्णसंख्येत ७.७ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे, नव्या करोना रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांचा आकडा देखील मोठा आहे. मात्र, करोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनामुळे २६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही अधिकृत आकडेवारी जारी केली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, देशात सद्यस्थितीत एकूण ३ लाख ९० हजार ६४६ ऍक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. तर देशातील आतापर्यंतची एकूण करोना रुग्णसंख्या ही ३ कोटी ३१ लाख ७४ हजार ९५४ वर पोहोचली आहे. त्याचसोबत, करोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ३ कोटी २३ लाख ४२ हजार २९९ इतका आहे. तर, देशात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्यस्थितीत करोनाचा रिकव्हरी रेट ९७.४९ टक्के इतका आहे.