मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची गणेश मंडळाप्रती कृतज्ञता
- शहरातील सर्व गणेश मंडळांचे मानले आभार
पिंपरी- यंदा कोरोनाचं सावट गणपती बाप्पाने दूर केलं. शहरात मोठ्या थाटामाटात वाजत गाजत गणरायांच आगमन झालं आणि काल त्यांना आनंदी वातावरणात निरोप दिला. गणेश मंडळांनी कोरोना काळात सामाजिक मदतकार्य केले. त्यांच्यामुळेच खरे तर आज बापांचा आनंदी सोहोळा शांततेत पार पडला, त्यामुळे शहरातील सर्व गणेश मंडळाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, अशा शब्दांत मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी गणेश भक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सचिन चिखले यांनी गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान प्रभागातील व शहरातील २३८ मंडळांशी हितगुज साधत श्रींचे दर्शन घेतले. मागील दोन वर्ष कोविडचा काळ कठीण होता. त्यावेळी शहर मनसेने कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदतकार्यात भाग घेतला. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले, अनेकांना वेळेवर मदत मिळाली, अनेकजण आपल्या मूळ गावी सुखरूप पोहोचले. गणेश भक्तानी गेली कित्येक वर्ष केलेल्या गणरायांच्या सेवेमुळे आपल्याला यंदा गणेशोत्सव आनंदाने साजरा करता आला, असे चिखले यांनी म्हटले आहे.