विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आजपासून रस्त्यावर

  • मोदी सरकारकडून विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र लसीकरण मोहीमेस चालढकल
  • केंद्र सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाला सुरूवात

पिंपरी / महाईन्यूज

गेल्या दिड वर्षांपासून देशातील महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून त्या पुरवठ्यानुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यांमध्ये सातत्याने तफावत आहे.

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून करण्यात आली आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचं नुकसान. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या सूचनेनुसार राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्यातील त्या त्या भागातील सर्व पदाधिकारी आपापल्या भागात लोकशाही मार्गाने विविध स्वरूपात आंदोलन करणार आहेत.

Share to