भाजयुमोच्या प्रदेश सरचिटणीस आणि युवा वॉरियर्स प्रदेश संयोजकपदी अनुप मोरे यांची नियुक्ती

  • राज्यभरातील युवकांना एकत्रित करून मोट बांधणार; अनुप मोरे यांचा संकल्प…

पिंपरी :- भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांची भाजयुमोच्या प्रदेश सरचिटणीस आणि युवा वॉरियर्स प्रदेश संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवा मोर्चा आणि युवा वॉरियर्सच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांनी राज्यभरातील त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवत पक्षाच्या संघटनात्मक वाढीकरिता अनुप मोरे हे अथक परिश्रम घेतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

भाजपमध्ये अनुप मोरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शहर भाजपा विद्यार्थी आघाडीच्या सरचिटणीस पदापासूनच केली होती. शहरातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनुप मोरे यांनी योगदान दिले. या पदावर राहून युवक-युवती, तरुण-तरुणी व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला त्यांनी प्राधान्य दिले. त्याचमुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली आहे.

अनुप मोरे म्हणाले, आज मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात माझी भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीसपदी व युवा वॉरियर्स प्रदेश संयोजकपदी निवड करण्यात आली. याबद्दल मी आमचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, भाजपाचे प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांचे मनापासून आभार मानतो. तळागाळातील व्यक्तींच्या हितासाठी काम करण्याचा संदेश आमच्या नेत्यांनी दिलेला आहे. तोच वसा घेऊन न थांबता जनहिताचे कार्य करत आलो आहे. यापुढेही पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर असेन. राज्यातील युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन. आगामी काळात केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणार आहे. महाराष्ट्रभरातून दीड लाखांपेक्षा जास्त ” धन्यवाद मोदीजी ” यांचे पत्र पाठवणार आहे. युवा वॉरियर्सच्या शाखांचा विस्तार आणि राज्यभरातील युवकांना एकत्रित करून युवा मोर्चाची ताकद वाढविण्याचा संकप केला आहे तो तडीस नेणार असल्याचे अनुप मोरे म्हणाले.

Share to