शिवसेना पिंपळे सौदागर विभागाच्या ” घरगुती गौरी गणपती सजावट ” स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद
पिंपरी :- गेली दोन वर्ष गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट होते. यंदा ते संकट टळले. त्यामुळे गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा झाला. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिवसेनेच्या पिंपळे सौदागर विभागाने पुढाकार घेतला. गणेशोत्सवा निम्मित्त ” घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर करीत बक्षीस वितरण समारंभ नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
आयोजकांच्या वतीने लिओन ओर्बिट सोसायटीतील विशाल डाटा यांच्या आकर्षक गौरी गणपती सजावटीला रोख रक्कम पाच हजारांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. रोख रक्कम तीन हजारांचे द्वितीय बक्षीस प्रशांत पोहरे यांना तर, दोन हजारांचे तृतीय पारितोषिक चित्रा सचिन पांडे यांना देण्यात आले. शिवाय सहभागी प्रत्येकास उत्तेजनार्थ बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, माजी गटनेते राहुल कलाटे, उपजिल्हा प्रमुख वैशालीताई मराठे, शहर संघटक संतोष सौंदणकर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, उत्तर भारतीय पिंपरी चिंचवड शहर प्रमुख मनिष श्रीवास्तव, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, विभाग प्रमुख मच्छिंद्र देशमुख, विभाग संघटिका कमल गोडांबे, उपविभाग प्रमुख भरत भिसे, उपविभाग प्रमुख सुदर्शन देसले, दीपक काळे, शाखा प्रमुख सुरज शिरसाठ, तुषार काळे, संदीप भालके, महेश कलाल, दीक्षित, कामिनी मिश्रा, उषा आल्हाट, डॉ. वैशाली कुलथे, अनुपमा उम्रजकर आदी उपस्थित होते.