श्रीराम चौक ही यमुनानगरमधील नागरिकांची संकल्पना – प्रा उत्तम केंदळे

पिंपरी (प्रतिनिधी) – मागील 2 वर्षांपूर्वी अयोध्या येथील प्रभू श्रीराम ह्यांच्या मंदिराच्या भूमिपूजन झाले या दिवशी दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी यमुनानगर येथे श्रीराम चौकाचे साधे नामफलक लावून उदघाटन करण्यात आले होते, ल. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नामकरणचा ठराव सुद्धा करण्यात आला होता

त्या पार्श्वभूमीवर रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर  पुन्हा एकदा त्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले.मा क्रीडा सभापती व नगरसेवक प्रा उत्तम  केंदळे ह्यांच्या संकल्पनेतून तिथे नवीन बांधकाम करण्यात आले.तसेच भिंतीवर मागे अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराचे तैलचित्र व प्रभू श्रीरामांवर आधारित श्लोक लिहिण्यात आले.

या चौकाचे उदघाटन विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री ऍड सतीश गोरडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारंग , अनिल अढी , विकास देशपांडे ,भाजपा चे दीपक कुलकर्णी,सावरकर मंडळाचे सेक्रेटरी प्रदीप पाटील, डॉ राजीव नगरकर ह्यांच्या मार्गदर्शनात चौकाचे काम पार पडले.तसेच श्रीरामरक्षा स्तोत्र पठण, मारुती स्तोत्र, नामाचा जप नागरिकांनी उत्साहात केला

ह्या प्रसंगी मुरलीधर सारडा, जगदीश साबळे, अभय खवासखान, पंकज कराड,भाजपचे प्रभाग अध्यक्ष रंगनाथ पवार ,अनिल वाणी,बाबा परब ,धनाजी मोरे, चंद्रकांत शेडगे, लक्ष्मण शेळके,महिला अध्यक्षा विमल काळभोर,अदिती धुळे, शिल्पा नगरकर ल,धोकटे काकी आदि अनेक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते उपस्थित होते. 

सुरुवातीपासून ह्या कामात नगरसेवक उत्तम केंदळे ह्यांच्या सोबत त्यांचे भाजप युवा मोर्चा मधील सहकारी गिरीश देशमुख ,आदित्य कुलकर्णी, आदित्य चौधरी, योगेश साळुंखे,प्रभू भालचंद्रन, कौस्तुभ देशपांडे, किरण घोटाळे, संकेत चित्ते, सचिन पिंजण यांनी सहकार्य केले.

Share to