माथाड़ीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या गुंडावरा वाकड पोलिसांची कारवाई

  • माथाडी कामगाराला धमकी, गुन्हा दाखल

पिंपरी, – माथाडी कामगारांना काम करण्यास प्रतिबंध करत मारहाण केल्याप्रकरणी संबंधित ४ व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकार हा ३१ जानेवारी रोजी फिनिक्स मॉल येथे घडला.
सदर प्रकरणी शनिवार दिनांक ११ रोजी भरत सुनील काशीद वय 22 राहणार चिंचवड गाव यांनी वाकडं पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मनोज पवार यांच्या साथीदार राकेश भुजबळ , पिंटू कलाटे, संतोष (मामा) चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे मयुरेश्वरा इंटरप्रयजेस या नावाने फिनिक्स मॉल येथे काम चालू आहे. यांचा माथाडी कामगार हा याठिकाणी गाडी खाली करत होता त्यावेळी आरोपींनी तिथे जावून गाडी खली करण्यासाठी किती पैसे घेतले अशी विचारांना केली तेव्हा माथाडी कामगार सुरेश कुसाळकर यांनी आम्हाला माथाडी मंडळाकडून पैसे मिळतात असे सांगितले . यावेळी सबंधित आरोपी यांनी माल उतरविण्यास प्रतिबंध करत मारहाण करत जबरदस्ती कामगाराच्या खिशात हात घालून 2000 रुपये काढून घेत धमकी दिली याप्रकरणी संबंधित प्रकाराबाबत वाकडं पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी वाकडं पोलीस पुढील तपास करीत आहेत

Share to