पाण्याच्या टाकीचा वापर सुरू करा – अनिता संदीप काटे

पिंपळे सौदागर – प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील पाण्याच्या समस्येबाबत लक्ष वेधले आहे. नवीन पाण्याची टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे जेणेकरून परिसरातील पाणीप्रश्न मार्गी लागेल अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अनिता संदीप काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व काम पुर्ण झाल्यानंतर ही अजून ही पाण्याची टाकी कार्यान्वित करण्यात आलेली नसल्यामुळे पानी पुरवठ्याचा प्रश्न उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भेडसावत आहे. पालिकेमार्फत दिवसांआड होणारा पाणीपुरवठा पण अनियमित आणि कमी दाबाने होणारा आहे ज्याच्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. नवीन पाण्याची टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे
सदर नवीन टाकी कार्यान्वित होण्यास एवढा विलंभ का लागत आहे? यामध्ये काय अडचणी आहेत ?

राजमाता जिजाऊ उद्यानात बांधण्यात आलेल्या २० लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याची टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे जेणेकरून परिसरातील पाणीप्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल अशी विनंती व जनतेचे पाण्याबदल प्रश्न सुटतील असे ही निवेदनात म्हटले आहे.

Share to