मोदी सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न – डॉ. कैलास कदम
पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – केंद्रातील मोदी सरकारने हुकूमशाही पध्दतीने कॉंग्रसेचे नेते खासदार राहूल गांधी यांच्यावर कारवाई केली. देशभरात वाढत चाललेली लोकप्रियता आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठी सुडबुध्दीने ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा चुकीच्या पध्दतीने उपयोग करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम मोदी सरकार करत आहे, अशा शब्दांत शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
नीरव मोदी, मेहूल चोक्सी, ललीत मोदी यांच्यासह मोदी नावांचे सर्वच चोर असल्याचा घणाघात राहूल गांधी यांनी केला होता. त्याचा आधार घेऊन गुजरातमधील सुरत न्यायालयाने दाखल याचिकेवर सुनावणी दिली. राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यामुळे न्यायालय, भाजपा आणि लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर सभागृहाच्या सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. याच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर भाजपा सरकारविरोधात जाहीर निदर्शने करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, गौतम अरकडे, अभिमन्यू दहितुले, महिला शहराध्यक्ष सायली नढे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, मागासवर्गीय शहराध्यक्ष विजय ओव्हाळ, भाऊसाहेब मुगुटमल, डॉ. मनीषा गरुड, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, बाबासाहेब बनसोडे, मिलिंद फडतरे, जेव्हीयर न्थोनी, निखिल भोईर, आण्णा कसबे, गौतम ओव्हाळ, सुनिल राऊत, अमर नाणेकर, लक्ष्मण रुपनर, अबुबकर लांडगे, भास्कर वानखेडे, हरिष डोळस, हिरा जाधव, दहर मुजावर, फिरोज तांबोळी, किरण नढे, दिपक भंडारी, आकाश शिंदे आदी आंदोलनात सहभागी होते.