नाना काटे सोशल फाऊंडेशच्या वतीने पिंपळे सौदागर येथे आरोग्य शिबीर

पिंपरी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाना काटे सोशल फाऊंडेशन व जीवन ज्योती हॉस्पिटल यांच्या विद्यमाने पिंपळे सौदागर येथे आरोग्य शिबिर राबविण्यात आले.

या शिबिराचे नाना काटे सोशल फाऊंडेशनचे ज्येष्ठ नागरिक विलास काटे, उत्तम धनवटे, अर्जुन काटे, तानाजी काटे, पोपट जगताप, जगन्नाथ काटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व योग्य उपचार, नाडी तपासणी, शरीराचे तापमान तपासणी, BMI, तपासणी, मधुमेह तपासणी, हिमोग्लोबिन चाचणी, रक्तदाब, BSL, ECG तपासणी इत्यादी तपासणी करण्यात आली.

या शिबिराचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते पुढील वैद्यकीय उपचारासाठी नाना काटे सोशल फाऊंडेशन तर्फे डिस्काऊट कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी जीवन ज्योती हॉस्पिटलचे डॉ. अतुल दायमा, डॅा. चद्रंशेखर अन्नदाते, डॅा. राजेंद्र साठे, डॅा. सस्मित जैस्वाल आदी उपस्थित होते.

Share to