सेवानिवृत्त कर्मचा-यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते माहे मार्च २०२३ अखेर सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अभिमान भोसले तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे मार्च २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार ३९ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सह आयुक्त आशादेवी दुरगुडे यांचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला