आम आदमी पार्टीचे “मोदी हटवा देश वाचवा” आंदोलन
पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मोदी हटवा देश वाचवा आणि देशाचा पंतप्रधान शिक्षित असावा का ? असे फलक हातात घेऊन आंदोलन निगडीतील मधुकरराव पवळे उड्डाण पूल येथे रविवारी (दि. 2) करण्यात आले.
भारतातल्या लोकांना आज शिक्षण किती महत्वाचे आहे हे समजले असून प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घालतात कारण त्यांना विश्वास असतो की उच्च शिक्षण घेऊन ते भविष्यात देशासाठी, समाजा साठी काही तरी चांगली काम करतील व पुढच्या पिढीसाठी उदाहरण ठरतील.जेव्हा साधारण माणसं शिक्षणाला एवढं महत्त्व देतात तर साहजिक आहे की देश चालवणारा अर्थात पंतप्रधान सुशिक्षित असलाच पाहिजे.भ्रष्टाचार, बेरोजगारी,महागाई इतकी वाढली आहे की भारताची अवस्था श्रीलंका आणि पाकिस्तान सारखी होण्यात जास्त वेळ लागणार नाही असं पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्री अनुप शर्मा यांनी बोलताना सांगितले.
आजच्या आंदोलनात अनुप शर्मा अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, स्मिता पवार अध्यक्ष महिला आघाडी, चेतन बेंद्रे कार्यकारी अध्यक्ष, वहाब शेख अध्यक्ष सामाजिक न्याय विंग पुणे जिल्हा, कपिल मोरे, नंदू नारंग, दीपक श्रीवास्तव, सीमा यादव, देवेंद्र यादव, सतीश नायर, सागर वाघज, रशीद अत्तार, मनोहर पाटील, संजय मोरे, गणेश जाधव, प्रकाश पठारे, सिद्दीक शेख, प्रियंका मोरे, सरोज कदम, राहुल वाघमारे, यशवंत कांबळे, एस पी पठारे, स्वप्निल जेवले, विशाल निर्मल, बाबुराव मिरगे, राज चाकणे, रोहित सरनोबत आदी उपस्थित होते.