सुर्यमुखी श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी

सुर्यमुखी श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी रीघ...

पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- प्राधिकरण आणि बिजलीनगर येथे मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. बिजलीनगर येथील हनुमान मंदिरात आणि प्राधिकरणातील सुर्यमुखी श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी रीघ लागली होती.

यावेळी हनुमान मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांसह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी जयंतीनिमित्त हा उप्रकम आयोजित करण्यात येतो, अशी माहिती आयोजक संतोष सौंदणकर यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी उद्योजक विशवनाथ वर्मा, संतोष सौंदणकर, राजीव कोहली, नितीन बोंडे, उमेश परदेशी, श्रीनिवास मांढरे, अरविंद पाटील, धर्मेंद्र राठोड, अंशुल बोंडे, नकुल मांढरे, अतुल बुर्डे यांनी आदींनी परिश्रम घेतले.

Share to