आपले साहेब उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीचे घरोघरी स्टिकर

ऐतवडे बुद्रुक मध्ये शहाजी गायकवाड यांच्यासह सहकाऱ्यांचे अभियान

सांगली ! प्रदीप लोखंडे

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा, जि. सांगली) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरदचंद्र पक्षाच्या वतीने आपले साहेब हा उपक्रम राबविण्यात आला. शहाजी गायकवाड यांच्या पुढाकाराने त्यांच्या सहकाऱ्यांसह हे अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन दिवंगत ज्येष्ठ नेते राजाराम बापू पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोटो असलेले स्टिकर लावण्यात आले. 

या उपक्रमात ऐतवडे बुद्रुक गावचे सरपंच सुभाष कुंभार, नंदकुमार गायकवाड, शशिकांत शेटे, अमोल गायकवाड, बंडा गायकवाड, डॉ. धनाजी माने, सुनील खरळकर, दिलीप चेंडके आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडली आहे. मात्र वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात त्याचा विशेष परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांचे समर्थक देखील त्यांच्यासोबत खंबीरपणे साथ देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आणि त्यांच्याप्रती निष्ठा ऐतवडे बुद्रुक गावातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आपले साहेब हा उपक्रम राबवित जयंत पाटील यांना समर्थन दिले आहे. जयंत पाटील यांचे विचार घरोघरी पोचविण्याचा कार्यकर्त्यांचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत दिवंगत ज्येष्ठ नेते राजाराम बापू पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोटो असलेले स्टिकर घरोघरी जाऊन लावण्यात आले. 

——————————————————

  • प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
  • मो. नं : 7350266967

Share to