महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (दोन) पदावर जितेंद्र वाघ यांची नियुक्ती
पिंपरी |प्रतिनिधी|
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उपमहाव्यवस्थापक जितेंद्र वाघ यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. याबाबत राज्य शासनाचे सहसचिव डाॅ. माधव वीर यांनी आदेश दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त (दोन) गेली सहा महिने झाले रिक्त होते. महानगरपालिका आकृतीबंध मंजूर झाल्याने अतिरिक्त आयुक्त पदाची तीन पदे निर्माण झाली होती. त्यात दोन प्रतिनियुक्ती आणि महापालिकेच्या सेवेतून भरले जाते. त्यानूसार अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे, तर आयुक्त आयुक्त (तीन) पदावर नगरसचिव उल्हास जगताप यांची नियुक्ती केलेली आहे.
तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार (दोन) यांची 7 एप्रिल 21 रोजी कार्यमुक्त केले होते. त्यामुळे सहा महिने झाले अतिरिक्त आयुक्त (दोन) हे पद रिक्त होते. शासनाने राज्याच्या महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक जितेंद्र वाघ यांची 17 सप्टेंबर रोजी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नेमणूक केली असून ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे.