प्रत्येक नागरिकांचे लसीकरण हीच आमची जबाबदारी – ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन

  • सनशाईननगर सोसायटीमध्ये कोविड प्रतिबंधक लसिकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी (प्रतिनिधी) – प्रभाग 27 चे नगरसेवक तथा ग क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकारातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सनशाईननगर सोसायटीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण माहीम घेण्यात आली. सोसायटीतील जेष्ठ नागरिक, महिला, तरुणांनी लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

एकदिवसीय लसीकरण मोहिमेचे उदघाटन नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक त्रिभुवन यांच्यासह ग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, डॉ. तापशाळकर, संजय गांधी निराधार योजना चिंचवड विधानसभा अध्यक्ष नरेंद्र माने, ग प्रभाग स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संजय मरकड, सामाजिक कार्यकर्ते संतोष विटकर, सोसायटीचे अध्यक्ष राहुल भोसले, सचिव नितीन काळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते, किशोर पांडे, राजेंद्र पाटील, प्रकाश कानिटकर, मयूर वानखेडे, अक्षय बाराथे, संतोष भोसले, सुनील दर्शीले, सनी माने, शंतनू त्रिभुवन, अंकुश त्रिभुवन, विजू कांबळे, संकेत माळेकर आदी उपस्थित होते.

बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, संपूर्ण मानव जातीवर कोरोनाचे संकट आले असून यातून कसाबसा मार्ग काढत आपण पुढे जात आहोत. हळूहळू परिस्थिती सुधारत असताना आता पुन्हा तिसऱ्या लाटेची भीती मनामध्ये कायम रहात आहे. तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची वेळ आलीच तर आपण स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी सर्वांचे लसीकरण करून घेतले जात आहे. बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ही समाधानकारक बाब असली तरी राहिलेल्या नागरिकांचे देखील लसीकरण होणे काळाची गरज आहे. त्यासाठीच याठिकाणी लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला आहे. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्रिभुवन यांनी केले आहे.

रविकिरण घोडके म्हणाले की, नागरिकांच्या काळजीपोटी अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकारातून याठिकाणी लसीकरण घेणे ही अभिमानाची बाब आहे. नागरिकांची सुरक्षा घेण्यासाठी संपूर्ण प्रभागात 100 टक्के लसीकरण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. तो साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी याठिकाणी उपस्थित राहून लस टोचून घ्यावी. यासाठी महापालिकेकडून लागणारे सर्व सहकार्य वेळेत करण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण करू.

Share to