महापालिकेच्या सायक्लोथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी – केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी लि. तर्फे रविवारी सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात सुमारे तीन हजारांवर स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. निगडीतील भक्ती- शक्ती चौकातून सायक्लोथॉन स्पर्धा सूरू झाली.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार शहरामध्ये आझादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवाचा आज रविवारी सायंकाळी समारोप आहे. त्याअंतर्गत सकाळी तीन टप्प्यांत सायक्लोथॉन स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेचे स्वरुप राष्ट्रीयस्तराचे असून यामध्ये ५०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा तीन प्रकारात होत आहे. लहान मुले, सर्वसाधारण गट व सराव करणा-या खेळाडूंसाठीचा गट आहे. अनुक्रमे ७ किलोमीटर, १५ किलोमीटर आणि ७५ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा आहे.
७५ किलोमीटर स्पर्धेचा मार्ग . . .
भक्ती शक्ती चौक – निसर्ग दर्शन सोसायटी – पिंपरी चिंचवड इंजि.- कॉलेज इनरव्हिल चौक – धर्मराज चौक मार्गे – डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज – बास्केट ब्रिज चौक मुकाई चौक मुकाई चौकातुन डावीकडे मुंबई बेंगलोर पश्चिम बाह्यवळण मार्गे भुमकर चौक – भुमकर चौकातुन यु टर्न वाय जंक्शन देहुरोड – सोमाटणे फाटा टोलनाका सोमाटणे फाटा टोलनाक्या वरुन यु – टर्न वाय जंक्शन देहुरोड मुकाई चौकातुन – बास्केट ब्रिज रावेत ( संत तुकाराम महाराज पुल ) – डांगे चौक येथील उड्डाणपुलावरुन सांगवी फाटा येथील होरे पाटील अंडरपास मधुन यु-टर्न काळेवाडी फाटा – एम.एम.स्कुल चौक – एम्पायर इस्टेट उड्डाणपुल – इंडोलिक युरो सिटी कंपनी पासुन मा.आयुक्त बंगला – के.एस.बी चौक उड्डाणपुलावरुन कुदळवाडी स्पाईन रस्ता चौक – नाशिक रस्त्याकडे जय गणेश साम्राज्य चौकातुन यु-टर्न – साने चौकापासुन डाव्या हाताला वळुन थरमॅक्स चौक – उजवीकडे बळुन दुर्गानगर चौक – स्पाईन रस्ता – भक्ती – शक्ती चौक.
१५ किलोमीटर स्पर्धेचा मार्ग
भक्ती शक्ती चौक – निसर्ग दर्शन सोसायटी – पिंपरी चिंचवड इंजि.- कॉलेज इनरव्हिल चौक – धर्मराज चौक मार्गे – डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज – किवळे बीआरटीएस टर्मिनल – पुन्हा भक्ती शक्ती.
७ किलोमीटर स्पर्धेचा मार्ग
भक्ती शक्ती चौक – निसर्ग दर्शन सोसायटी – आकुर्डी स्टेशन – संभाजी चौक- पुन्हा भक्ती-शक्ती…