राजर्षी छत्रपती शाहू महाराज रयतेचे लोककल्याणकारी राजे होते- अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप

समाजातील सर्व घटकांना समानतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी व स्त्रीशिक्षणाचा प्रसार करण्याकरिता कृतीशील प्रयत्न करणारे आरक्षणाचे जनक तसेच कुस्ती, संगीत,चित्रपट, लोककला यासारख्या क्षेत्रांतील खेळाडु आणि कलावंतांना राजाश्रय देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे लोककल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पिंपरी येथील महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच के.एस.बी. चौक,चिंचवड येथील पूर्णाकृती पुतळ्यास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या दोन्ही कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग पाटील,मिलींद वेल्हाळ,जगदीश परिट, सुनील पाटील,महिला अध्यक्षा अर्चना तौंदकर आदी उपस्थित होते.

Read more