फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा, पिंपरी युवासेनेची मागणी

पिंपरी | महाईन्यूज

कोरोना काळानंतर एकीकडे व्यवसाय व उद्योगधंदे पूर्वपदावर येत असताना महापालिकेकडून पथारीधारक, भाजीविक्रेते व हातगाडी फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेकडून सर्व फेरीवाले, भाजीविक्रेते व पथारीधारक यांचे नव्याने सर्वेक्षण करावे. त्यांना हॉकर्स झोनची आखणी करून द्यावी. त्याबाबतचे धोरण तयार असूनदेखील अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. भाजीविक्रेते, पथारीधारक व हातगाडीवर व्यापारीवर्गावर कारवाई करण्यापूर्वी त्यांची नोंदणी करावी.

त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. त्यानंतर नियमबाह्य व्यवसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी युवा सेनेने केली आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका अतिक्रमण विभाग अधिकारी  इंगळे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके, सामाजिक कार्यकर्त्या शीला जाधव, सुनील झिटे, अनिकेत घुले, जीवन चलवारे, संकेत जावळकर, लश्मी भंडारे, मोजेस अंतोनी, रंजना कांबळे आदी उपस्थित होते.

Share to