नाना काटे सोशल फाऊंडेशन आणि श्री फाऊंडेशनतर्फे 150 अनाथांना दिवाळी भेट
पिंपरी | महाईन्यूज
दिवाळीनिमित्त नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील १८ वर्षाखालील १५० मुला-मुलींना मनपसंतीनुसार काळेवाडी येथील वामन फॅशन क्लॉथ स्टोअर्स मधुन कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, शालेय वस्तू खरेदी करून देण्यात आल्या. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठठ्ल ऊर्फ नाना काटे, आश्रमाचे संस्थापक सागर पाडाळे आदी उपस्थित होते.