पिंपरी युवासेनेच्या वतीने संविधान दिन साजरा
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी युवासेनेच्या वतीने आज संविधान दिन साजरा करण्यात आला.
आज संविधान दिनानिमित्त पिंपरी युवासेनेच्या वतीने दापोडीमधील एस. बी. पाटील स्कूल व स्वामी विवेकानंद मंदिर शाळेतील शिक्षकांना संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य घारे सर, सुभाष गारगोटे, अशोक पाटील, शिक्षक वर्ग तसेच युवा सेनेचे रवी नगरकर, अविनाश जाधव, विशाल लिंबोरे, रोहित गोरे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले.