पिंपळे निलख येथे संविधान मूल्यांचे जनत करण्याचा निर्धार!
- संविधान दिनानिमित्त भाजपा अनुसूचित जाती विभागाचा कार्यक्रम
- परिसरातील उपस्थित नागरिकांकडून भारतीय संविधानाचे वाचन
पिंपरी । प्रतिनिधी
भारतीय संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार पिंपळे निलख येथील कार्यक्रमात करण्यात आला.
भाजपा नेते तथा चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे निलख येथील पंचशील बुद्ध विहारामध्ये संविधान सन्मान दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेवक संदिप कस्पटे, नगरसेविका आरती चोंधे, नितीन इंगवले, केवल जगताप , पवन कामठे, शिल्पा कांबळे, कल्पना सदाकाळ, विद्या जगताप, राहुल मित्र मंडळ अध्यक्ष प्रदीप जगताप आदी उपस्थित होते.
या प्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, उपस्थितांनी संविधानाचे वाचन करुन संविधानातील मुल्यांचे जतन करण्याचा निर्धार केला.