पोलीस शिपाई पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदाच्या 720 जागांच्या भरतीसाठी नुकतीच लेखी परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबरला पारपडलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
100 गुणांच्या या लेखी परीक्षेत 2 उमेदवारांना सर्वाधिक 98 गुण मिळाले आहेत. तर सहा उमेदवारांना चक्क शून्य गुण मिळाल्याचे समोर आले आहे. परीक्षेच्या दरम्यान सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या केंद्रवर पोचता आले नव्हते. तर परीक्षेला एक लाख 7 हजार 124 विद्यार्थी गैरहजर राहिले होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या 720 जागांसाठी राज्यभरातून तब्बल एक लाख 89 हजार 732 अर्ज आले होते. या लेखी परीक्षेसाठी राज्यभरातील युवकांनी अर्ज केले होते. लेखी परीक्षे दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होवू नये, यासाठी परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात आले होते.