स्वीकृत सदस्य संदीप गाडे व मीरा क्लासिक सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वीकृत सदस्य संदीप गाडे व मीरा क्लासिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त जयंती निमित्त शनिवारी (दि. 18) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. रक्ताच्या उपलब्धतेविना भविष्यात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्येला तोंड देण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये. या उदात्त हेतुने सदस्य संदीप गाडे यांच्या पुढाकाराने हे रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे.

थेरगाव येथील संतोषनगर, मिरा क्लासिक, शॉप नंबर 11 येथे सदस्य संदीप गाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय याठिकाणी हे रक्तदान शिबीर पार पडणार आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांनी केले आहे.

Share to