मोरया गोसावी मंदिर परिसरातल्या फेरीवाल्यांवरील निर्बंध हटवा, अन्यथा आंदोलन करणार – काशिनाथ नखाते

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ब क्षेत्रीय कार्यालय आणी पोलिस यांचेकडुन  मोरया गोसावी मंदिर परिसरातील विक्री करणारे पथ विक्रेत्यांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. हे निर्बंध तातडीने उठवावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.

वास्तविक गणेश चतुर्थी, गणेश जयंती आणि संजीवन समाधी महोत्सव कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भक्त येत असून या भक्ताच्या सेवेकरिता फेरीवाले स्वस्तात वस्तू उपलब्ध करून देत असतात. मात्र, महापालिका आणि पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर निर्बंध घालून खूप मोठा अन्याय केला आहे. हा अन्याय दूर करून तातडीने त्यांचे व्यवसाय सुरू करू द्यावेत. हा व्यवसाय म्हणजे पिढ्यानपिढ्या सुरू आहे, आणि शहर आता झालेलं आहे. हे अन्यायकारक  निर्बंध हटवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त,  पोलीस आयुक्त तसेच मुख्य विश्वस्त मंदार देव यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर राजेश माने, अनिल बारवकर, इरफान चौधरी, राजू बिराजदार आदींच्या स्वाक्षरी आहेत.

महासाधू मोरया गोसावी महोत्सव देवस्थान तर्फे २५ डिसेंबरपर्यंत हा उत्सव आनंदात सुरू आहे. मात्र, हातावरचे पोट असणाऱ्या त्यांच्या कुटुंबामध्ये घोर निराशा निर्माण झाली आहे. हे   सचोटीने व्यवसाय करून जगणाऱ्या गोरगरीबांवर होनारा अन्याय मोरया गोसावी यानां कसे मान्य होईल. प्रशासनाने पथ विक्रेता अधिनियम २०१४ या कायद्यानुसार त्यांना व्यवसाय करता यावा, अशी व्यवस्था करण्यात यावी. त्यांच्यासाठी नियम व अटी लावून व्यवसायासाठी नियोजण करावे. अन्यथा यामुळे अनेक लोक बेरोजगार होणार असून त्यांची रोजीरोटी हिरावली जाणार आहे. याबाबत आपण तातडीने बैठक घेऊन सदरच्या पथ विक्रेत्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यात यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने अंदोलन करण्यात येईल, असा ईशारा दिला आहे.

Share to