उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरात दहा ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन

  • पती संजय भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त कुंदाताई भिसे यांचा स्तुत्य उपक्रम
  • पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने युवक, तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी  केले कौतुक

पिंपरी (प्रतिनिधी) – उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी पती संजय भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथील विविध ठिकाणी पाणपोई सुरू केल्या आहेत. गोविंद गार्डन, मंदिर, लिनियर गार्डन, वॉकींग ट्रॅक, मार्केट आदी परिसरात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक, क्रीडा मैदानावर व्यायाम व वॉकिंग करणारे युवक, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांनी कुंदाताईंच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाची तिव्रता वाढत असताना या उपक्रमातून पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत.

हिवाळा संपूण आता उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाची तिव्रता वाढू लागल्याने आपल्या भागातील नागरिक, मैदानावर खेळाणारे युवक, वॉकींग करणारे ज्येष्ठ नागरिक, मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणारे नागरिक तसेच खरेदी करण्यासाठी बाजारात येणा-या नागरिकांना पिण्याचे पाणी जागोजागी उपलब्ध व्हावे, यासाठी उन्नति सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून कुंदाताई भिसे यांनी पती संजय भिसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठिकठिकाणी पानपोई सुरू केल्या. पतींच्या वाढदिसानिमित्त त्यांनी उन्नति सोशल फाऊंडेशनच्या कार्यालयाजवळ प्रथम पाणपोई सुरू केली. पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक हभप जगन्नाथ काटे यांच्या हस्ते शुक्रवारी त्याचे उद्घाटन झाले. तसेच, कोकणे चौक, शिवार चौक, दत्तमंदिर, गणेश मंदिर, साई मंदिर व इतर दहा ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आल्या. त्या-त्या ठिकाणच्या पाणपोईचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दीपक गांगुर्डे, शिरिश शास्त्री, राजू शेलार, राजेंद्र जेसवल, विकास काटे, सुधाकर भिसे, कैलास कुलकर्णी, गुलाब काटे, मुरलीधर काटे आणि पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळे सौदागर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे यांची समाजासाठीची निष्ठा पाहून अभिमान वाटतो. त्यांच्यातील प्रबळ इच्छाशक्ती, भविष्याबाबत कृतीशीलता आणि आशावादी दृष्टीकोन युवकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. वारकरी सांप्रदायाची जपणूक करणारे संजय भिसे यांच्यासारखे व्यक्तीमत्व काळानुरूप क्वचितच घडत असते. त्यांच्या हातून लोकांची सेवा अखंडपणे घडत रहावी, त्यासाठी त्यांना उंदड आयुष्य लाभो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रर्थना करतो, अशा शब्दांत हभप कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांनी संजय भिसे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.    

पिंपळे सौदागर येथील कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बुधवारी (दि. 9) अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महंत हभप कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप, कीर्तनकार चंद्रकांत महाराज वांजळे, संतोष महाराज पायगुडे, शेखर महाराज जांभूळकर, महावीर महाराज सूर्यवंशी, माऊली महाराज आढाव, विजूअण्णा जगताप, सतिश भुजाडे, निवृत्ती महाराज भोरकर (शास्त्री), विकास तात्या काटे, किशोर पाटील, तानाजी काळभोर आदींनी संजय भिसे यांना शुभेच्छा दिल्या.

आभार व्यक्त करताना कुंदाताई भिसे म्हणाल्या की, समाजकार्यातून जनसंपर्क वाढवून विकासकामे करण्यावर भर दिला. लोकांची सेवा हेच आमच्या घराण्याचे वृत्त आहे. ते गेल्या चार वर्षांपासून आम्ही प्रमाणिकपणे पाळत आलो आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी येथील जन्मभूमीशी त्याचे ऋणानुबंध जुळलेले असतात. त्याचा आदर राखून आमची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पिंपळे सौदागर भागाच्या विकासात समाजकार्याच्या माध्यमातून योगदान देण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. त्यातून राजकीय प्रवास सुरू झाला असला तरी 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हेच आमचे ध्येय आहे. समाजकार्यात नागरिकांनी जशी साथ दिली, तशाच प्रकारे नागरिकांची साथ राजकीय क्षेत्रात काम करताना मिळेल, याची मला खात्री आहे, असेही कुंदाताई भिसे म्हणाल्या.  

Share to