चिथावणीखोर वक्तव्य करणा-या कालीचरण महाराजांना अटक
पुणे – राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या कालीचरण महाराजला आज पुण्यात आणलं जाणार आहे. ३० डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली होती. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती. येथील टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आता पुणे पोलिसांनी कालीचरण महाराजला पुण्यातील नातूबाग येथे १९ डिसेंबरला शिव प्रताप दिनानिमित्त आयोजित भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कालीचरण महाराजविरोधात पुण्यातील खडक पोलीस स्टेशनकामध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर कालीचरण महाराजला आज पुणे पोलिसांनी रायपुर येथून ताब्यात घेतले आहे. दुपारी साडेतीन वाजता कालीचरण महाराजला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.