आज तब्बल 817 जणांना कोरोनाची लागण, तर एकजण ओमायक्रॉन पॉझीटिव्ह
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शहरात आज दिवसभरात तब्बल ८१७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ओमायक्रॉनचे १ रूग्ण आढळून आले आहेत. सातत्याने वाढणारा कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. दरम्यान आज दिवसभरात २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आज दिवसभरात ८१७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या दररोजच्या मोठ्या रुग्ण वाढीमुळे आज शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २१६२ इतकी झाली आहे. यातील २८२ रूग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १८८० रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
गुरूवार, दि.०६ जानेवारी २०२२
आजची रूग्णसंख्या = ८१७
ओमीक्रॉनचे आज बाधित = ०१
आजपर्यंत एकूण बाधित = २८१३२९
आज मयत = ०१
आजपर्यंत एकूण मयत = ४५२६
सध्या सक्रिय रूग्णसंख्या = २१६२
आज डिस्चार्ज = २२