भाजपाप्रमाणे शिवसेनेला महाराष्ट्र हे शक्य नाही, कारण उध्दव ठाकरे हे पेपरफुटीमुळे पास झालेले मुख्यमंत्री

मुंबई – उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजप सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहे. 403 पैकी 400 जागांचे कल उघड झाले आहेत. या ट्रेंडमध्ये भाजपने 250 चा टप्पा ओलांडला आहे. तर समाजवादी पक्षानेही 120 चा आकडा गाठला आहे.

पाच राज्यातील निवडणुकीत शिवसेनेने देखील दोन राज्यांत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. यावरून भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, निवडणूक झालेल्या ५ पैकी चार राज्यात आधीही भाजपाच होती आणि विरोधकांनी कितीही टीका केली तरी आताही भाजपाच येणार आहे. हे यश परफॉर्मन्सचे आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला ते कधीही शक्य होणार नाही, कारण पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखत २६९ जागांवर आघाडी घेतली आहे. अद्याप निकाल आले नसले तरी भाजपने सत्ता राखल्याचं चित्र आहे.

Share to