सोशल डिस्टंसिंग पाळून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

पिंपरी (प्रतिनिधी) – रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटीप्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने दहावीच्या परीक्षा उत्साहात सोशल डिस्टंसिन्ग पाळून सुरु  करण्यात आली. 

तब्बल दोन वर्षानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला बुधवारपासून (ता. १६) सुरुवात झाली. करोनामुळे खंड पडलेली दहावीची परीक्षा बुधवारी पुन्हा उत्साहात सुरु झाली. नियोजनानुसार मराठी विषयाचा पेपर झाला. ऑफलाईन परीक्षा  असल्याने बहुतांश विद्यार्थी दडपणाखाली होते. त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. 

सकाळी साडेनऊपासून केंद्रांवर विदयार्थी व विद्यर्थिनीची गर्दी होऊ लागली.पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी बरोबरच पालकांच्या चेहऱ्यावर ताण होता.त्यामुळे पाल्य वर्गात जाईपर्यंत पालक त्यांना सूचना देत होते. साडेदहाची घंटा वाजल्यावर तपासणी करून विदयार्थ्यांना आत सोडले.

साडेदहाची घंटा वाजल्यावर तपासणी करून विदयार्थ्यांना आत सोडले. संस्थेचे संस्थापक मा. अरुण चाबुकस्वार सर, शाळेच्या मुख्याध्यपिका आसावरी घोडके मॅडम, केंद्रउपसंचालक  सचिन कळसाईत सर, परिवेक्षक सुनंदा साळवी मॅडम, यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. शाळेत दिव्यांगांसाठी विशेष सोय केली आहे. तसेच कॉपीमुक्त अभियान साठी शाळेने  देऊन स्वागत करण्यात आले. 

शाळेत दिव्यांगांसाठी विशेष सोय केली आहे. तसेच कॉपीमुक्त अभियानसाठी शाळेने विशेष खबरदारी घेतलेली आहे. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार न होण्याची खबरदारी शाळेनी घेतली आहे अशी माहिती केंद्रउपसंचालक सचिन कळसाईत सर यांनी दिली आहे. 

Share to