भाजपाच्या बेगडी हिंदुत्वाचा हिजाब उतरवण्यासाठी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन कामाला लागुयात – अॅड. सचिन भोसले
- शिवसेनेचं हिंदुत्व कुणापुढे कदापी झुकणार नाही – अनंत को-हाळे
- शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्याची भाजपाकडून एमआयएमला सुपारी – संतोष सौंदणकर
पिंपरी (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा टिकवण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवसेनेचा धगधगता अंगार बनून उभ्या देशातील हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी दिलेली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. भाजपाच्या बेगडी हिंदुत्वाचा हिजाब उतरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपल्याला काम करायचे आहे, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख तथा मा. नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी केले.
चिंचवडगाव येथील वेताळनगर शाखेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सोमवारी (दि. 21) सकाळी दहा वाजता वेताळनगर शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख भोसले बोलत होते. याप्रसंगी चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, विभाग प्रमुख श्रीमंत गिरी, राजेश आरसुळे आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांचा जयघोष करण्यात आला. सायंकाळी सात वाजता पिंपरी-चिंचवड शहराच्या संपर्क संघटिका वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते पालिकेतील सफाई कर्मचारी व विधवा महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी उप जिल्हा संघटिका वैशाली मराठी, उपशहर प्रमुख सुधाकर नलावडे, विभाग प्रमुख श्रीमंत गिरी, विभाग प्रमुख किरण दळवी, शाखाप्रमुख हरीश शर्मा, कुदरत खान, सुग्रीव अडगळे, मुस्तफा शेख, रमेश शेंडगे, अनिल शिंदे, विनोद वायदंडे, महेश शेत संधी, खय्युम पठाण, जगन्नाथ कराडकर, धनंजय सूर्यवंशी, रफिक बेग, अनिल बोराडे, सुनील बोराडे, बाळासाहेब आगळे, बाबू खान, संतोष शिंदे, सुनील मोरे, पांडुरंग आडागळे, आकाश भोसले, संदीप लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनंत को-हाळे म्हणाले की, मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भाजपाच्या हिंदुत्वात आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात जमीन आसमानचा फरक आहे. शिवसेनेचं हिंदुत्व कुणापुढे झुकणारं नाही. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदुत्वाची जपणून करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या हिंदुत्वाची अवहेलना शिवसैनिकाने कदापी सहन करायची नाही, असेही को-हाळे म्हणाले.
संतोष सौंदणकर म्हणाले की, बेगडी हिंदुत्वाच्या आडून भाजपा एमआयएमसारख्या शत्रु पक्षाच्या लोकांना आपल्यासोबत हातमिळवणी करण्याची सुपारी देत आहे. भाजपाचे कटकारस्तान उधळून लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र चरणावर नतमस्तक होऊन स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अग्नि अखंड तेवत ठेवण्याचा एक शिवसैनिक म्हणून माझा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वांचा अवमान करणा-याला जनता योग्यवेळी लायकी दाखवेल. त्यावेळी दुश्मन पक्षाचा बेगडी हिंदुत्वाचा चेहरा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही, असेही सौंदणकर यांनी ठणकावून सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन वेताळनगर शाखेचे शाखाप्रमुख मजीद शेख, उपविभाग प्रमुख कुदरात खान, किशोर सातपुते, सुग्रीव आढागळे, राजेश आरसूळ, कलावती नाटेकर जमो नसरीन शेख आदी शिवसैनिकांनी केले.