हेन्कलतर्फे स्त्री मासिक धर्म स्वच्छता जागरुकता अभियान
पुणे (प्रतिनिधी) – हेन्कल अडेजीव्ह टेक्नॉलॉजीज इंडिया तर्फे व लायन्स क्लब पुणे सहकारनगर, दगडुशेठ दत्तमंदिर ट्रस्ट पुणे, दुर्गम प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून लक्ष्मणराव आपटे प्रशाला ,डेक्कन जिमखाना येथे 450 मुलींना सुमारे अडीच लाखाचे 25,000 हजार सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आले.
याप्रशालेत वडारवाडी,जनवाडी,गोखलेनगर इत्यादी भागातील मुली शिक्षण घेत आहेत. यावेळी मुलींना डाॅक्टर सुजाता दोशी, सरिता सोनवळे यांनी मुलींना स्त्री मासिक धर्म स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी हेन्कलचे मॅनेजर डाॅक्टर प्रसाद खंडागळे यांनी भारतभर विविध 8 शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये 10 लाखापेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन वाटप चालु असल्याचे सांगीतले. आधुनिक भारताचे शिल्पकार या आदिशक्तीकडुन निर्माण होणार आहेत त्यासाठी आमचाही खारीचा वाटा असे उदगार काढले.
यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे राजेंद्र बलकवडे , दुर्गम प्रतिष्ठानचे नंदकुमार जाधव, रविद्र पठारे,मुख्याध्यापीका सौ. मेधा सिन्नरकर, लायन्स क्लबच्या युगा तालिम,ललिता शिंदे,सेक्रेटरी जयश्री दिवाकर ,हेन्कलचे किर्ती काटकर,मांडवी जैस्वाल शाळेतील शिक्षिका कविता शिंदे इ. उपस्थित होते. सौ. माधवी येलारपुरकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. यावेळी गिफ्ट पाहुन अनेक मुलींच्या चेहऱ्यावर आयुष्यभराचे हास्य उमटले होते.