मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिक्रियेनंतर चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक ट्वीट

मुंबई – ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर काल कारवाई केली.  या कारवाई दरम्यान ११ फ्लॅटवर ईडीने टाच आणली आहे.  केंद्रीय तपास यंत्रणेने  थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी  खळबळजनक वक्तव्य केले आहे.

वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाड यांनी तपास यंत्रणांचा वापर करुन राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे त्यावर आता वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण माझं मत विचारालं तर मी माझ्या पोरीला महाराष्ट्रात ठेवणार नाही असे  वक्तव्य राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच त्यांच्या मुलीला नुसतं चौकशीला बोलवलं तरी ती आत्महत्या करेल असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.

https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FChDadaPatil%2Fposts%2F3083547605295760&show_text=true&width=500

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबूकवर पोस्ट लिहत निशाणा साधलाय.

Share to