सुसगाव महादेव नगर परिसरातील रस्त्याचे काम त्वरीत मार्गी लावा, विद्यार्थ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे – सुसगाव महादेव नगर  सर्वे नंबर 160 परिसरातील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी विद्यार्थी ऋषीकेश कानवटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात कानवटे यांनी जीमेलद्वारे ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महादेव नगर सर्वे नंबर 160 येथील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. हे काम पावसाच्या  आत पूर्ण करण्यात यावे. कारण, या ठिकाणी ये-जा करण्यासाठी एकच रस्ता आहे. आणि तो रस्ता पावसामध्ये भयंकर गसरगुंडीचा रस्ता बनतो. त्या ठिकाणाहून  ये-जा करणे अशक्य होते. प्रशासन या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत.

मला एक विद्यार्थी म्हणून प्रश्न पडतो, या ठिकाणावर लहान मुले कसे  ये-जा करणार आहेत. आता पुढें सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा महाविद्यालय सुरु होणार आहेत. तेव्हा लहान मुलांनी आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे का ? किंवा प्रशासन या ठिकाणी कोणाचा  जीव गेल्यानंतर जागे होणार आहे का ? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे. तरी, मुख्यमंत्री साहेब आपण यात लक्ष घालून रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी कानवटे यांनी केली आहे.

Share to