कष्टकरी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे कष्टकऱ्यांच्या हस्ते अनावरण

पिंपरी (प्रतिनिधी) – कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे एक दिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलन शनिवार, २६ मार्च २०२२ रोजी रोजी होत आहे या संमेलनाची  कष्टकऱ्यांना ओढ लागलेली आहे, सर्व कष्टकरी

महिलांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज करण्यात आले. सुनिता साळवे, कलावती दिलपाक,सुनिता पोतदार.    वैशाली इजगज, शकुंतला शिंदे उज्वला चौघूले, पल्लवी लोंढे, उषा आव्हाड, लता कांबळे,कांता गाडे,  विदया सोनावणे आदी कष्टकरी महिला यावेळी उपस्थित होते.

शनिवारी सकाळी ठीक साडेआठ पासुन श्रमशक्ती भवन, बजाज ऑटोसमोर, आकुर्डी येथे आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन नामदार अजितदादा पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे कष्टकरी कामगारांचे प्रतिबिंब व पद्मश्री नारायण नारायण सुर्वे यांचे काव्य त्याचबरोबर वेगवेगळ्या कष्टकरी कामगारांचे प्रश्न यानिमित्ताने साहित्य रूपातून मांडण्यात येणार आहेत .सदरच्या संमेलनाला शहरातील कष्टकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी महिलांनी केले.

Share to