वाल्हेकरवाडी, चिंचवडमधील विद्युत विषयक कामे मार्गी लावण्यास महावितरणचा हिरवा कंदील
- शिवसेना विभाग प्रमुख संदीप भालके यांच्या पुठपुराव्याला यश
- अर्थपुरवठ्यासाठी संतोष सौंदणकर पालकमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा
पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड व वाल्हेकरवाडी येथील विद्युतविषयक कामे मार्गी लावण्यासाठी शिवसेना विभाग प्रमुख संदीप भालके यांनी महावितरणच्या चिंचवड उपविभागीय कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. कृष्णाई कॉलनी, मोरया कॉलनी, स्वप्नशिल्प आणि शेवंतीबाई कॉलनीमधील विद्युतविषयक प्रलंबीत कामे मार्गी लावण्यासाठी भालके यांनी केलेले प्रयत्न अखेर यशस्वी ठरले. ही कामे मार्गी लावण्यासाठी शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांच्या मध्यस्तीनंतर महावितरणच्या अधिका-यांनी याकामी हिरवा कंदील दाखविला. यासह शहरातील विद्युविषयक अन्य प्रलंबित कामांसाठी अपेक्षित असणारा पाच कोटींची खर्च उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सौंदणकर यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. मात्र, आज काही भागात स्मार्ट शहरीकरणाचा लवलेशही पहायला मिळत नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पालिकेतील नुकतेच पायउतार झालेल्या भाजपा सत्ताधा-यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला. म्हणून वाल्हेकरवाडी, चिंचवड भागातील विकासकामे कायमचीच रखडली. वाल्हेकरवाडी आणि चिंचवड भागात विद्युतविषयक प्रलंबित कामांसाठी गेली पाच वर्षांपासून पाठपुरावा कायम ठेवला आहे. पालिकेच्या विद्युत विभागाने याची दखल घेऊन अद्याप कार्यवाही केलेली नाही. शेवटी महावितरणच्या चिंचवड उपविभागीय कार्यालयाकडे पाठपुरावा करावा लागला. महावितरणच्या अधिका-यांनी मात्र, कोणत्याही प्रकारचा मुलाहिजा न ठेवता ही कामे कशी मार्गी लावता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला, अशी माहिती संदीप भालके यांनी सांगितली.
पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देणार – सौंदणकर
कृष्णाई कॉलनी, मोरया कॉलनी, स्वप्नशिल्प व शेवंतीबान कॉलनीमधील विद्युत विषयक कामे प्रलंबित राहिली. कृष्णाई कॉलनीमध्ये एलटी एक्सएलपीई केबल 120 एसक्युएसएस 300 मीटर बसविणे, एलटी मिनी फिडर पिलर 05 नॉस आणि अर्थिंग वुईथ जीआय पाईप 10 नॉस ही कामे करण्यासाठी 1 लाख 96 हजार 702 एवढा खर्च अपेक्षित आहे. तर, स्वप्नशिल्प आणि शेवंतीबन कॉलनीमध्ये एलटी मिनी फिडर पिलर 06 नॉस, अर्थिंग वुईथ जीआय पाईप 12 नॉस ही कामे करून घेण्यासाठी 1 लाख 2 हजार 774 एवढा खर्च अपेक्षित आहे. यासह शहरातील विद्युतविषयक अन्य कामे करण्यासाठी ‘डीपीडीसी’मध्ये एकूण 5 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एवढी रक्कम उपलब्ध करून घेण्यासाठी शिवसेना शहर संघटक संदोष सौंदणकर यांच्या माध्यमातून भालके यांनी चिंचवड उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव आणि पिंपरीतील कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांच्यासोबत बैठक घेतली. भालके यांनी याकामी केलेल्या पाठपुराव्याबाबत अधिका-यांना माहिती दिली. यावेळी निवेदनही देण्यात आले. दरम्यान, चर्चा केल्यानंतर पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुठपुरावा करण्याचे आश्वासन सौंदणकर यांनी अधिका-यांना दिल्याची माहिती भालके यांनी सांगितली. यावेळी विभाग प्रमुख किरण दळवी, प्रकाश निंबळकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.