संतपीठ स्कूल आणि कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित चिखली जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल ऍन्ड ज्युनियर कॉलेज येथे शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निर्धारित केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा तिपटीने अर्ज आल्याने ही प्रक्रिया व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार सोडत पद्धतीने अतिशय पारदर्शीवातावरणात पार पडली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (दि. 4 एप्रिल) प्रवेशाची सोडत पालकांच्या संमतीने व मान्यवरांसह पालकांच्या हस्ते पार पाडण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त तथा संतपीठाचे संचालक संदीप खोत, संचालक राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ. स्वाती मुळे, मनपा शिक्षण विभाग पर्यवेक्षक सुनिल लांघी, रामदास लेंभे, पर्यवेक्षिका अनिता जोशी, मनपा आदर्श शिक्षिका सुनिता पवार, उषा काळोखे, आकांक्षा फाउंडेशनचे निखील एकबोटे, आदी मान्यवर, संतपीठ कर्मचारी वृंद यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये पूर्व प्रथमिक व प्राथमिक वर्गाच्या नर्सरीपासून ते इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे संतपीठाच्या संचालकांनी सांगितले.

सूत्रसंचलन धर्मेंद्र भांगे यांनी केले तर सखाराम पितळे यांनी आभार मानले.

शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी आलेल्या एकूण 970 प्रवेश अर्जांपैकी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाची प्रवेश संख्या सोडत पद्धतीने खालीलप्रमाणे निश्‍चित करण्यात

वर्गनिश्चित केलेली विद्यार्थी संख्यामुलीमुले
नर्सरी७०३५३५
ज्युनिअर के.जी३०१५१५
सिनीअर के.जी२७१३१४
पहिली४०२०२०
दुसरी४०२०२०
तिसरी४०२०२०
चौथी४०२०२०
पाचवी४०२०२०
एकूण३२७१६३१६४
Share to