पिंपरीतील महापालिकेचा जलतरण तलाव नागरिकांसाठी उद्यापासून खुला
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी वाघेरे येथील महापालिकेचा जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने मान्यता दिली आहे. उद्या बुधवार (दि. 13) पासून हा जलतरण तलाव शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे.
हा जलतरण तलाव शनिवार ते गुरूवार सकाळी सहा ते दहा आणि दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा या वेळेत सर्वांसाठी सुरू राहणार आहे. महिलांसाठी सकाळी नऊ ते दहा आणि दुपारी अडीच ते साडेतीन ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. साप्ताहीक सुट्टी शुक्रवारी राहील, अशी माहिती क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांनी कळविली आहे.