मंत्री नवाब मलिक यांना ईडीचा दणका, मोठ्या प्रमाणात संपत्ती जुप्त

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या याचिकेत नवाब मलिक यांनी न्यायालयाकडे तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने आज मोठी कारवाई केली आहे.

ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील महत्त्वाची संपत्ती आणि उस्मानाबादेतील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने संबंधित कारवाई ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने नवाब मलिकांचे मुंबईतील पाच फ्लॅटवर जप्ती आणली आहे. यातील तीन फ्लॅट हे कुर्ला तर दोन फ्लॅट हे वांद्रे परिसरातील आहेत.

ईडीने प्रेसनोट जारी करत कारवाईबाबत माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यव्हार करुन संबंधित संपत्ती मिळवली आहे. म्हणून या संपत्तीवर जप्ती आणल्याचं ईडीचं म्हणणं आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत उस्मानाबाद येथील 148 एकर शेतजमीनीचाही समावेश आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 11 कोटी 70 लाख रुपये या संपत्तीमधून कंट्रोल करत होते. त्यांची सॉरीडोस नावाची कंपनी आहे.

दरम्यान उस्मानाबादची संपत्ती वगळता इतर सर्व संपत्ती त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दाखवल्या असाव्यात, अशी चर्चा सुरु आहे. मात्र यातील सत्य अद्याप समोर आलं नाही.

Share to