किरीट सोमय्यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण देत त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सोमय्यांना मोठा दिसाला मिळाला आहे.

उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांना जामीन मंजूर करत येत्या सोमवारपासून पुढील सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देशही दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेने आज अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटिस पाठवली होती.

या प्रकरणात किरीट सोमय्यांची बाजू मांडण्यासाठीया प्रकरणात वकील विवेकानंद गुप्ता हे पोलीस आयुक्त कार्यालयात गेले होते. त्यामुळे आजही किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. तसेच, आयएनएस विक्रांत प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. त्यावर बोलताना योग्य वेळी किरीट सोमय्या समोर येतील, असे त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी म्हटले आहे.

Share to