‘तुम्ही राजकारणात कशासाठी, घरी जा स्वयंपाक करा’ चंद्रकांत पाटीलांची सुप्रिया सुळे यांच्यावर टिका
पुणे – ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपाने आज मोर्चा काढला. दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती महाकाली तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते, अश्या शब्दात रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय.
तुम्ही खासदार आहात ना, मुख्यमंत्र्यांची भेट कशी घेतात, हे तुम्हाला माहित नाही? शिष्टमंडळ पाठवायचं असतं एवढंही माहित नाही. आता तुम्ही घरी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही राजकारणात कश्यासाठी राहत आहात. घरी जा, स्वयंपाक करा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रोटोकॉलही समजावला.